रेमडेसिवीरशिवाय रुग्ण ठणठणीत, लातूरच्या कोविड सेंटरमधील डॉक्टरांची कमाल

सीटी स्कोअर वाढलाय. ऑक्सिजनची पातळी खालावली आहे. व्हेंटिलेटरशिवाय आता पर्यायच नाही. रेमडेसिवीरची तातडीने व्यवस्था करा. अशीच सध्याची काहीशी परिस्थिती आहे. पण इतक्या गंभीर अवस्थेत पोहोचल्यानंतरही कोरोनावर मात करणारे रुग्ण आहेत. लातूरमधील अशाच एका रुग्णाला व्हेंटिलेटर आणि रेमडेसिवीरशिवाय केवळ डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने ठणठणीत केले.

लातूर महानगरपालिकेच्या पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन येथील कोविड सेंटरमधील डॉक्टर आणि कर्मचाऱयांच्या पथकाची ही कमालच म्हणावी लागेल. हा रुग्ण उपचारासाठी आला तेव्हा त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 40 होती. सीटी स्पॅन केल्यावर त्याचा कोरॅड्स स्कोअर 25 पैकी 22 होता. रुग्णाची अवस्था गंभीरच होती. डॉ. प्रशांत माले आणि डॉ. आसिफ सेख यांच्या पथकाने या रुग्णावर उपचार सुरू केले. या रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याची किंवा रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची गरजही भासली नाही. आठ दिवस तो कोविड सेंटरमध्ये दाखल होता. योग्य पद्धतीने केलेले उपचार निश्चितच सफल होतात. प्रत्येक गंभीर रुग्णाला व्हेंटिलेटर किंवा रेमडेसिवीर लागतेच असे नाही. हे डॉक्टरांनी दाखवून दिले.

कांदिवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर आणि पोलीसमित्र यांच्या मदतीने पोईसर डेपोजवळील आणि कपोल शाळेच्या परिसरातील गोरगरीबांना आणि हातावर पोट असणाऱया कामगारांसाठी जेवण आणि पाणीवाटपाचे आयोजन करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या