अनैतिक संबंध ठेवण्यासाठी होत होती छळवणूक, महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

अनैतिक संबंध ठेवण्यासाठी होणाऱ्या छळामुळे महिलेने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना चाकूर तालूक्यातील येलमवाडी येथे घडली. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, दिनांक 14 ऑक्टोबर रोजी आईने फोनकरुन सांगितले की, बहिण मंगल हिने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. तिला लिंबाळवाडी येथील गणेश विश्वंभर चलवदे, कार्तिक विश्वंभर चलवदे आणि नागीन पवन गंजीले हे सर्वजण गणेश याच्यासोबत का बोलत नाहीस, त्याच्यासोबत अनैतिक संबंध का ठेवत नाहीस म्हणून छळत होते. त्यामुळे ती लिंबाळवाडी येथून माहेरी येलमवाडी येथे राहण्यास आली तरी तिथे येऊन तो त्रास देत होता. त्यांच्या छळास कंटाळूनच मंगल हिने आत्महत्या केली. चाकूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.