अल्पवयीन विवाहितेस फूस लावून पळवले

1020

लातूरला माहेरी आलेल्या एका अल्पवयीन विवाहीतेस फूस लावून पळवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेची आई फिर्यादी संगीता हाणमंतराव गायकवाड यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह २०१७ मध्ये कर्नाटकातील शिलगूर येथे करून दिलेला होता. लग्न झाल्यापासून ती पती विकास लोखंडे याच्यासोबत शिलगूर ता. बस्वकल्याण येथेच रहात होती. पंचमीच्या सणासाठी म्हणून ती लातूर येथे आली होती. पण ८ सप्टेंबर रोजी दुपारी दिड ते दोन वाजण्याच्या सुमारास आजीला सैलानी बाबा देवाला जाऊन येते असे सांगून ती घराबाहेर पडली. पण ती परत घरी आलीच नाही. सर्वत्र शोधाशोध करूनही ती सापडली नाही. म्हणून अखेर गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अज्ञात व्यक्तीविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या