अहमदपूरमध्ये शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान एक युवक दहीहंडी फोडताना जखमी झाला होता. त्याला अहमदपूर येथे प्रथोमपचार करून पुढील उपचारांसाठी लातूर येथे पाठवण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योध्दा प्रतिष्ठान अहमदपूरच्या वतीने दिनांक 28 ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवामध्ये सहभागी संघाच्या विजेत्यांसाठी पारितोषिक ठेवण्यात आली होती. यासाठी अहमदपूर शहरासह बाहेरील अनेक मंडळांनी सहभाग नोंदवला होता. तसेच उत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी दहीहंडी फोडताना साठे नगर येथली युवक उदय महेश कसबे (17) हा दहीहंडी फोडताना थरावरून कोसळला. त्याला जखमी अवस्थेत लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच दहीहंडीचे आयोजन करणार्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुटुबियांनी केली आहे.
आयोजकांनी स्पर्धेचे नियम, अटी आधीच स्पष्ट केलेले असताना टीम संयोजकांनी याची काळजी घेतली होती का नाही? पोलीस याबद्दल काय भूमिका घेतात? तक्रार झाल्यानंतर पोलीस यावर काय भूमिका घेतील? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून लवकरच या सर्व बाबी स्पष्ट होतील. अधिक तपास पोलीस करत आहेत.