Latur News – संतापजनक घटना ! चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार

निलंगा तालुक्यातील व कासार शिरसी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रामलिंग मुदगडवाडी येथील एका 34 वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. 30 ऑगस्ट रोजी मौजे रामलिंग मुदगडवाडी येथील एक 34 वर्षीय महिला तिचे राहते घरी झोपली असता बाजूच्याच रामलिंग मुदगड गावातील शिकलोधन बाबुराव कांबळे याने त्या महिलेच्या घरी जाऊन त्या महिलेला चाकूचा धाक दाखवून त्याच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन त्याच्या रामलिंग मुदगड येथील घरी नेऊन मध्यरात्री 2 ते 4 च्या सुमारास बलात्कार केला व याची माहिती कोणाला सांगितल्यास जीवे मारीन अशी धमकी दिली अशी फिर्याद पीडित महिलेने कासार शिरसी पोलीसात दिल्यावरून शिकलोधन कांबळे याच्या विरुद्ध गुरनं 213/2024 कलम 64,333 भारतीय न्याय संहिता BNS अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेतील आरोपी फरार झाला असून या घटनेचा पुढील तपास कासार शिरसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय पाटील हे करीत आहेत.