लातूर – एटीएम कार्ड अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या आरोपीस अटक

लातूर जिल्ह्यामध्ये एटीएम कार्डची अदलाबदली करून स्थानिक नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीस गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे. लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळै यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सायबर पोलीस ठाणे व गांधी चौक पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी यांना मार्गदर्शन करून वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्यासंबंधी माहिती उपलब्ध करून सदर गुन्हा उघडकीस आणण्यासंदर्भात सुचना केल्या होत्या.

संबंधित पथकाने गुन्हे घडलेल्या ठिकाणास भेट देऊन आरोपींच्या गुन्हा करण्याच्या पध्दतीची माहिती घेतली. तसेच महाराष्ट्रांमध्ये असे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती प्राप्त करून घेवून सदर आरोपींच्या हालचालीवर लक्ष केंद्रित केलेले होते. यावरून बाहेरील जिल्ह्यातील आरोपी लातूर जिल्ह्यात येऊन गेले असून सदरचा गुन्हा त्यांनी केल्याबाबत खात्रीशीर माहितीच्या आधारे सदर पथकाने उल्हासनगर जि.ठाणे येथून गणेश भालचंद्र लोडते उर्फ फौजी (वय – 25, रा. संत ज्ञानेश्वर नगर, खेमाणी उल्हासनगर-2, जि.ठाणे) यास ताब्यात घेतले.

गुन्ह्यासंदर्भात बारकाईने विचारपूस केली असता पोलीस ठाणे गांधी चौक व अहमदपूर पोलीस ठाणे हद्दीतील एटीएम कार्ड अदलाबादली करून लोकांच्या बँक अकाऊंट मधुन रोख रक्कम काढुन फसवणूक केल्याचे कबुल केले. त्याच्या ताब्यातुन गुन्ह्यात वापरलेली वेगनार कंपनीचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

या आरोपीने अकोला, यवतमाळ, वर्धा, नांदेड, हिंगोली, धाराशिव, सोलापूर, पुणे येथे त्याच्या साक्षीदारासमवेत फिरला असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीस पुढील तपासकरिता पोलीस ठाणे गांधी चौक लातूर येथे हजर केले आहे.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक लातूर निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक सुरज गायकवाड, पोलीस नाईक संतोष देवडे, रियाज सौदागर, राजेश वंâचे, गणेश साठे, सायबर पोलीस ठाणे लातूर, पोलीस निरीक्षक संजय हिबारे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे, पोलीस नाईक शाम दडडे, नारायण वाघमारे पोलीस ठाणे गांधी चौक लातूर यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या