तक्रार मिटवण्यासाठी घेतली 10 हजाराची लाच, पोलीस कर्मचारी ACB च्या सापळ्यात अडकला

1278
प्रातिनिधिक फोटो

लातूर जिल्ह्यातील देवणी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याने तक्रार मिटवण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

देवनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एका तक्रारींमध्ये तडजोड करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने पंधरा हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर दहा हजार रुपये तक्रारदाराकडून पोलीस कर्मचारी मुरलीधर मारोतीराव दंतराव (वय 48 वर्षे) घेण्याचे मान्य करुन लाचेची रक्कम स्वतः स्विकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना तत्काळ ताब्यात घेतले.

माणिक बेद्रे, पोलीस उपअधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार दराडे हे करत आहेत अशी माहिती लातूर ACB टीमच्या बाबासाहेब काकडे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या