लातूर येथे शाळकरी विद्यार्थीनीस पळवले

7395

रेणापूर तालूक्यातील मौजे कारेपूर येथून शाळेत गेलेल्या विद्यार्थिनीस मोटारसायकलवरून अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकूर पोलीस ठाण्यात या संदर्भात दिलेल्या तक्रारीत रघुनाथ खंडुबूवा पुरी यांनी नमूद केले आहे की, फिर्यादीची अल्पवयीन पुतणी 2 डिसेंबर रोजी घरातून सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शाळेत गेलेली होती. दुपारी तिच्या शाळेतील शिक्षकांनी फिर्यादीच्या घरी दुपारी 12 च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मुलीस मोटारसायकलवरुन पळवून नेल्याची माहिती दिली. फिर्यादी सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांना ही माहिती कळाली. त्यानंतर त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. पण मुलगी सापडली नाही. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या