लातूर – वाढवणा पोलीस ठाण्यातील 7 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

1691

कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावणार्‍या वाढवणा पोलीस स्टेशनच्या 7 पोलीस कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोना पाँझीटिव्ह आले आहेत.

कोरोनाचा कहर सध्या सुरू झालेला आहे. कोरोना वाढू नये यासाठी पोलीस दिवस रात्र कर्तव्य बजावत आहेत. केवळ शहरी भागातच नाही तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही आता कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज वाढवणा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी असे एकूण सात कर्मचार्‍याचे अहवाल पाँझीटिव्ह आढळुन आले. खबरदारीचा उपाय म्हणुन पोलीस स्टेशनची इमारत व कर्मचार्‍याची निवासस्थाने सॅनिटाइझ करण्यात आले.

दरम्यान, जिल्ह्यात एका पोलीस स्टेशनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाँझीटिव्ह रुग्ण आढळुन आल्याने चिंतेत भर पडली आहे. याबाबत डॉ. वर्षा कानवटे यांना विचारणा केली असता सात कर्मचारी सध्या पाँझीटिव्ह असुन त्यांच्या कुटुबांची व संपर्कात आलेल्या व्यक्तीची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. शिवाय कोरोनाचा वाढता फैलाव पाहता विनाकारण गर्दीचे ठिकाण टाळावे, मास्कचा वापर करावा, वारंवार हाथ धुवावे. नागरिकांनी या आजारामुळे घाबरुन जाऊ नये असे आवाहन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या