कोरोनामुळे उदगीर तालुक्यातील लोणी येथे वृद्धाचा मृत्यू

लातूरमधील उदगीर तालुक्यातील मौजे लोणी येथे कोरोणामुळे एका 78 वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत्युनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता. कोरोनामुळे मृत्यू झालेली उदगीर तालुक्यातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी एका महिलेचा आणि एका पुरुषाचा मृत्यू झालेला होता.

उदगीर तालुक्यातील मौजे लोणी येथील एका 78 वर्षाच्या व्यक्तीस उदगीर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. शनिवारी त्याचा स्वॉब लातूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. शनिवारी रात्री त्यांना कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला त्यामुळे उदगीर तालुक्यातील कोरोना मृत्यूची संख्या तीन वर पोहोचली. संबंधित व्यक्तीचा दफनविधी कोरोना झाल्याचे गृहीत धरुनच सर्व प्रकारची काळजी घेत करण्यात आला होता. त्यानंतर तातडीने संबंधित व्यक्तीचे घर सील करण्यात आले असुन गावही सील केले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या