कोकळगाव येथे दारुबंदीसाठी महिलांचे उपोषण

84

सामना प्रतिनिधी। कोकळगाव

निलंगा तालूक्यातील कोकळगाव, कामलेवाडी येथील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी म्हणून कोकळगाव, कामलेवाडी येथील महिलांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

मागील काही वर्षांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू आहे. यामुळे तरुणांमध्ये दारूचे व्यसन वाढल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. काही गावातील तरुणांनी दारूच्या आहारी जाऊन आपले जिवन संपवले आहे. तरुण पिढीमध्ये दारूचे व्यसन वाढण्याचे सत्र सुरू आहे. हे कोठे तरी थांबले पाहिजे म्हणून सोमवार १५ एप्रिल रोजी निलंगा तालूक्यातील कोकळगाव, कामलेवाडी येथील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी म्हणून कोकळगाव, कामलेवाडी येथील महिलांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

या दारूबंदीच्या उपोषणासाठी समाधान माने, सुरेश लामतूरे, अलका शानिमे, मंगलबाई वाकडे, मद्रासबाई पाटील, निलावती वांजरवाडे, नागुबाई पोतदार आदी उपोषणासाठी बसले आहेत. या दोन्ही गावात दारूबंदी झाल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही असे महिलांनी सांगितले आले. या दारूबंदीच्या उपोषणासाठी परिवर्तन महिला मंडळ हडोळी, सावित्रीबाई महिला मंडळ किल्लारी, बचतगट महिला मंडळ सरवडी यांनी पाठींबा दिला आहे. उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे, सावित्रीबाई महिला मंडळ किल्लारी यांनी भेट दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या