गरज भासल्यास ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात नवीन कायदा आणणार

579

ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात कायदा करण्याचे केंद्र सरकारचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. हा कायदा लागू झाल्यावर गरज भासल्यास राज्याच्या दृष्टिकोनातून विचार करून ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात नवीन कायदा करू असे आश्वासन राज्याचे अन्न व औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज विधानसभेत दिले. एमटीपी किटची ऑनलाइन विक्री करणाऱया 66 कंपन्यांवर कारवाईचा बगडा उगारण्यात आल्याचीही त्यांनी यावेळी माहिती दिली.

राज्यात एमटीपी किटची ऑनलाइन विक्री करणाऱयांवर निर्बंध घालण्याबाबतचा तारांकित प्रश्न बुधवारी आमदार अमीन पटेल, सुलभा खोडके, विकास ठाकरे यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी वरील माहिती दिली. दरम्यान, यावेळी राज्याने ऑनलाइन औषध विक्रीसाठी स्वतंत्र कायदा करावा या मागणीसाठी अनेक आमदारांनी आग्रही मागणी यावेळी केली. तर यावेळी चर्चेत अनेक आमदारांनी सहभाग नोंदवीत वरील मागणी लावून धरली.

यावेळी प्रश्नाला उत्तर देताना राजेंद्र शिंगणे म्हणाले की, ऑनलाइन औषधांची विक्री करणाऱया कंपन्यांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहेत. यासंदर्भात अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.

– कायद्याचे उल्लंघन करून ऑनलाइन औषध विक्री होत असल्याचे आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाकडून संबंधित आस्थापनाचे परवाने रद्द करणे निलंबित करण्याबरोबरच्या त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्याबाबतचे सूचना केल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाला यासंदर्भातील कारवाई सक्तीने करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या