पाकिस्तानमध्ये कायदा सुव्यवस्थेचे वाजले तीन तेरा, इम्रान खान यांच्या समर्थकांनी संसदेला घातला घेराव; पोलिसांनी केला गोळीबार

पाकिस्तानमध्ये कायदा सुव्यवस्थेचे तेरा वाजले आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकले असून त्यांच्या समर्थकांनी मोर्चा काढला आहे. खान यांच्या समर्थकांनी संसदेला घेराव घातला आहे. आणि खान यांची सुटका करावी अशी मागणी केली आहे.

 

जमावाला आवरण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी महामार्ग बंद केले असून मोबाईल सेवा निलंबीत केली आहे. दुसरीकडे पोलिसांनी केपीचे मुख्यमंत्री अली अमान गंदापूर यांना अटक केली आहे. अली अमान पक्षाच्या आंदोलनात सहभागी होणार होते म्हणून त्यांना अटक केल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे.