शाल्वी सांगणार प्रेमाचा कायदा

अभिनेत्री शाल्वी शहा ‘लॉ ऑफ लव्ह’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. याविषयी शाल्वी म्हणते, ‘लॉ ऑफ लव्ह’च्या निमित्ताने मोठी संधी मिळाली असून त्याचे सोने करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही निव्वळ प्रेमकथा नाही, तर ताकूनसुलाखून निघालेलं प्रेमवीरांचे प्रेम आहे. सध्याच्या काळानुसार आणि परिस्थितीनुसार बदललेल्या प्रेमाला आरसा दाखवणारा हा चित्रपट आहे,

शाल्वी चित्रपटात साक्षी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. प्रत्येक क्षेत्रात नाव कमविण्यासाठी किंवा स्थान निर्माण करण्यासाठी मेहनत करावी लागते, आपल्या कामातून स्वत:चा वेगळेपणा सिद्ध करावा लागता याची जाण ठेवून इंडस्ट्रीत वाटचाल करणार असल्याचे शाल्वीने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या