बायकोचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, तिसऱ्या नवऱ्याला वकील महिलेने चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला

murder

पश्चिम बंगालमधल्या एका स्थानिक न्यायालयाने महिला वकिलाला नवऱ्याच्या हत्येच्या आरोपाखाली दोषी ठरविले आहे. आनंदिता पाल डे असं या महिलेचे नाव असून तिला तिचा नवरा रजत डे याच्या हत्येबद्दल शिक्षा सुनावली जाणार आहे. तिला शिक्षा काय द्यायची हे न्यायालय बुधवारी जाहीर करणार आहे.

आनंदिताचा नवरा रजत (35 वर्षे) हा देखील वकील होता आणि तो कोलकाता उच्च न्यायालयात वकिली करत होता.विधाननगर आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या न्यू टाऊन भागात हे दाम्पत्य राहात होतं. नोव्हेंबर 2018 मध्ये रजत डे याची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येच्या 5 दिवसांनंतर आनंदिता हिला अटक करण्यात आली होती. आनंदिताने तिचा गुन्हा कबूल केल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. रजतच्या हत्येची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलिसांत दिली होती. त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं, की त्यांच्या मुलाला हे स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपली बायको जिच्यासोबत आपण बाहेर जेवायला गेलो होतो,ती त्याच रात्री आपला खून करेल.

25 नोव्हेंबर 2018 च्या रात्री आनंदिता आणि रजत यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. आनंदिताच्या कथित विवाहबाह्य संबंधांवरून हे भांडण झालं होतं. या भांडणानंतर रजत याने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. या धमकीमुळे आनंदिताने आपणच नवऱ्याला ठार मारूया असा विचार करायला सुरुवात केली होती. तिने मोबाईलचा चार्जर घेतला आणि त्याच्या वायरने गळा आवळून रजतचा खून केला. सुरुवातीला तिने दावा केला होता की बेडशीटच्या सहाय्याने गळफास बनवत रजतने ही आत्महत्या केली होती. मात्र तिचं पितळ पोलीस चौकशीत उघडं पडलं. आनंदिताचं हे तिसरं लग्न होतं आणि तिला रजतपासून एक दीड वर्षांचा मुलगा देखील आहे.

आपली प्रतिक्रिया द्या