न्यायव्यवस्थेबाबत ट्विटरवर अपमानकारक पोस्ट; कंगनाविरोधात वकिलाची तक्रार

मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. कोर्टाने कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर कंगनाने ट्विटरवर न्यायव्यवस्थेवरच चिखलफेक केली आहे. न्यायसंस्थेबाबत ट्विटरवर अपमानकारक पोस्ट केल्याप्रकरणी एका वकिलाने तिच्या विरोधात तक्रार केली आहे.

वांद्रे मेट्रोपोलिटीन कोर्टाच्या आदेशावरून एका प्रकरणात कंगना आणि तिच्या बहिणीला पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले आहे. त्यावर कंगनाने ट्विट करत बॉलीवूड कलाकारांना देशातील धर्मांबाबत येथील कायदा आणि सरकारी संस्थांबाबत आदर नाही. अगदी न्यायव्यवस्थेची चेष्टा चालवली आहे असे ट्विट केले होते.

याविरोधात अॅड. अली कासिफ खान देशमुख यांनी देशद्रोहाचा आणि दोन धार्मिक गटांमध्ये मतभेद निर्माण केल्याचा कंगनावर आरोप करत अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात तक्रार दाखल केली. तसेच कंगनाने आपल्या ट्विटमध्ये पप्पू सेना असाही न्यायसंस्थेचा उल्लेख केल्याचे अॅड. खान देशमुख यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी अंधेरी येथील कोर्टात 10 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या