अंगावर झाड पडून वकिलाचा मृत्यू

14

सामना प्रतिनिधी । ठाणे

अंगावर झाड पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज शनिवारी संपली. किशोर पवार (३९) असे या तरुणाचे नाव असून व्यवसायाने तो वकील होता. उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात त्याने प्राण सोडले.

ठाण्यातील पाचपाखाडी येथील उदयनगर येथे सोसायटीतील झाड रस्त्यावरून बाईकवर जाणाऱया किशोरच्या अंगावर पडल्याची घटना शुक्रवारी घडली होती. त्याच्या पश्चात एक मुलगा, पत्नी, आई व वडील असा परिवार आहे. किशोरच्या मृत्यूने नामदेववाडी, पाचपाखाडी भागात शोककळा पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या