लक्ष्मण झुल्यावर अमेरिकन महिलेने बनवला अश्लील व्हिडीओ, पोलिसांनी केली अटक

ऋषिकेश येथील प्रसिद्ध लक्ष्मण झुल्यावर एका अमेरिकेन महिलेने अश्लील व्हिडीओ बनवल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेला अटक करण्यात आली आहे.

हे प्रकरण तेव्हा उघडकीला आलं, जेव्हा काही स्थानिकांनी काही महिलांना स्थानिक फोटोग्राफर्ससह लक्ष्मण झुल्यावर आक्षेपार्ह व्हिडीओ काढताना पाहिलं. त्यांनी त्या संपूर्ण प्रकाराचे फोटोही काढले. ते व्हायरल झाले आणि स्थानिक नेत्यांनी याला विरोध केला. त्यामुळे हे प्रकरण पोलिसात गेलं. तेव्हा या पैकी ज्या महिलेचा फोटो पोलिसांकडे आला होता, तिची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा तिने माळेचा ऑनलाईन व्यवसाय करण्यासाठी जाहिरात म्हणून हा व्हिडीओ काढल्याचं सांगितलं. पोलिसांनी या महिलेला सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.

यापूर्वीही असाच प्रकार एका फ्रान्सच्या महिलेने केला होता. तिनेही साधारण असंच कारण पोलिसांना दिलं होतं. मात्र, नंतर आपला जबाब बदलून लैंगिक शोषणाविरोधातील जागृतीसाठी हा व्हिडीओ बनवल्याचं म्हटलं होतं. लक्ष्मण झुल्यावरही तिला नकोशा नजरांचा त्रास झाल्याचं विधान तिने केलं होतं. त्यावेळीही त्या महिलेला अटक करण्यात आली होती, तसंच तिच्यासोबत एका स्थानिक फोटोग्राफरलाही अटक झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या