नोटवर लक्ष्मीचा फोटो छापल्यास रुपया वधारेल, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींचा दावा

680

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. अशावेळी हिंदुस्थानी चलनावर देवी लक्ष्मीचा फोटो छापल्यास रुपयाचे मूल्य वाढेल असा अजब दावा भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी केला आहे.

मध्य प्रदेशमधील एका भाषणात स्वामी म्हणाले की इंडोनेशियामध्ये आर्थिक मंदी असताना त्यांनी 10 हजारच्या नोटावर गणपतीचा फोटो छापला होता. कार्यक्रमानंतर यावर प्रश्न विचारल्यावर स्वामी म्हणाले की, “गणपती हा विघ्नहर्ता आहे. धनाची देवी लक्ष्मीचा फोटो आपण नोटांवर छापला पाहिजे. त्यामुळे हिंदुस्थानचे चलन सुधरू शकते. यावर कुणाला वाईट वाटण्याचे कारण नाही.” यावर आता पंतप्रधान मोदी उत्तर देऊ शकतात. नोटावर लक्ष्मी देवीचा फोटो छापावा असे माझे मत असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देताना स्वामी म्हणाले की, या कायद्यात काहीच चुकीचे नाही. अशा प्रकारच कायदा आणण्यास महात्मा गांधींचाही पाठिंबा होता.

आपली प्रतिक्रिया द्या