लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘हे’ कराल तर व्हाल कंगाल!

125

सामना ऑनलाईन । मुंबई

आज लक्ष्मीपूजन… लक्ष्मीमातेचा वास सदोदित आपल्या घरी असावा असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळे लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर तुम्ही दिवसभरात खाली दिलेली कामे केली नाहीत, तर नक्कीच तुमच्या घरी लक्ष्मीदेवींना प्रसन्न करू शकता.

– दिवाळीच्या दिवसात जास्त वेळ झोपू नका. या दिवसात सकाळी लवकर उठल्याने लक्ष्मीदेवी सदैव प्रसन्न राहते.

– संध्याकाळी झोपणे सहसा टाळावे. असे केल्याने लक्ष्मीदेवी नाराज होते.

– दिवाळीच्या दिवसात कोणतेही व्यसन करू नका. दारू, सिगारेट, यांसारख्या अनेक व्यसनांपासून दूर राहिल्याने घरात शांती प्रस्थापित होते.

– आपल्यापासून वयाने व मानाने मोठ्या असलेल्या व्यक्तींचा अपमान करू नका. या दिवसात त्यांची सेवा केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते.

– दिवाळीच्या दिवसांत भांडण करू नका. भांडण केल्याने लक्ष्मीची अवकृपा होते.

– घर नीटनेटके व साफ ठेवा. घराबाहेर तोरण लावा, शिवाय दाराबाहेर रांगोळी काढा. यामुळे तुमच्या घरात देवीदेवता सदैव प्रसन्न राहतील.

– सणांच्या दिवसात रागावर निंयत्रण ठेवा. कोणालाही काहीही वाईट बोलू नका.

आपली प्रतिक्रिया द्या