विधीमंडळात घुसून अधिकाऱ्याने दिली धमकी; धनंजय मुंडेंचा आरोप

19

सामना ऑनलाईन, मुंबई

विधीमंडळाचं कामकाज सुरू असताना आर.डी.आकरूपे नावाच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांना धमकी दिली आहे. गुटखाबंदी असतानाही राज्याच्या अनेक भागात सर्रासपणे ब्लॅकने गुटखा विकला जातो. हा मुद्दा धनंजय मुंडे यांनी उपस्थित करण्यासाठी लक्षवेधी मांडली होती. ही लक्षवेधी का उपस्थित केली असा प्रश्न विचारत आकरूपे यांनी मुंडेंच्या ओएसडींना धमकावल्याचा आरोप मुंडेंनी केलाय. विशेष म्हणजे त्यावेळी आकरुपेंसोबत भाजपचा उदगीरचा आमदारदेखील उपस्थित होता असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.

धमकीबाज आकरूपेंचा विषय मुंडे यांनी तातडेनी विधानपरिषदेच्या निदर्शनास आणला.अधिकाऱ्यांचा उद्दामपणा वाढला असून विरोधी पक्षाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले म्हणून धमक्या येत असतील तर व्यवस्थेसाठी मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटले. आकरुपेंना तत्काळ निलंबित करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आर डी आकरूपे हे ठाण्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये सहायक अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतात. आकरुपे यांच्याबद्दल याआधीही अनेक तक्रारी करण्यात आल्या असून त्यातील काही प्रकरणांमध्ये त्यांची चौकशीही झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या