थेंबे थेंबे ट्रे मध्ये पाणी साचे! रत्नागिरी जिल्हापरिषद शिक्षण विभागात गळती

रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या इमारतीला प्रचंड गळती लागली असून शिक्षण विभागात थेंबे थेंबे ‘ट्रे’ मध्ये पाणी साचे अशी अवस्था झाली आहे.फाईल ठेवायचे ट्रे आणि कागदाचे कपडे टाकायच्या डब्यांचा उपयोग गळणारे पाणी थांबविण्यासाठी केला जात आहे.

जिल्हापरिषदेच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील शिक्षण विभाग पावसात चिंब भिजत आहे. विभागातील वीजेच्या तारांजवळ हे पावसाचे पाणी साचत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनातही मोठी गळती सुरू आहे.तसेच जिल्हापरिषदेच्या डाव्या बाजूच्या जिन्यामध्येही पावसाचे पाणी येत असल्याने जिन्यावरून चालणे धोकादायक बनले आहे. दरवर्षी पावसाळ्यात शिक्षण विभागात ही गळती सुरू असते.दरवर्षी गळतीबाबत दुरूस्तीच्या चर्चा होतात मात्र अजूनही जिल्हापरिषदेच्या दुसऱ्या मजल्यावर होणारी गळती थांबवता आलेली नाही.