इंग्रजी शिकून साऱ्या जगावर प्रभुत्व मिळवा- सुमित्रा महाजन

33

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

इंग्रजानी आपल्याला इंग्रजी शिकवलं,आता तुम्ही इंग्रजी शिकून साऱया जगावर प्रभुत्व मिळवा, असे आवाहन करताना तुम्ही तुमच्या गुरुकूलमध्ये बाकी सर्व गोष्टी शिकवत आहात. त्यातून उद्याची उत्तम पिढी तयार होईल अशी आशा लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केली. त्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कै. बाबुराव जोशी गुरुकूल प्रकल्पाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

सुमित्रा महाजन म्हणाल्या की, आज याठिकाणी वास्तूचे उद्घाटन होतेय याचा मला खूप आनंद होतोय. नाहीतर अशी भूमिपूजनं खूप करतो. या वास्तूचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले होते. त्याचवेळी शिल्पा पटवर्धन यांना हे काम पूर्ण होईल ना असे विचारले होते. आज समाधान वाटते या लोकांनी विश्वास सार्थ ठरवला. त्यांनी चांगलं काम केलं.

बाबुराव जोशीचं कार्य पद्मभूषण किंवा पद्मविभूषणला योग्य

१९२५ साली रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी उभारुन रत्नागिरीतील मुलांना शिक्षणाचे दार उघडे करुन देणाऱ्या बाबुराव जोशी आणि मालतीबाई जोशी यांच्या कार्याविषयी माहिती देताना संस्थेच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन यांनी बाबुराव जोशी यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा अशी मागणी शिल्पा पटवर्धन यांनी आपल्या भाषणात केली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी बाबुराव जोशी यांच कार्य पद्मभूषण किंवा पद्मविभूषण पदासाठी योग्य आहे, त्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या