दूध का कर्ज! म्हशीची सेवा करण्यासाठी सुट्टी द्या, पोलीस कॉन्स्टेबलचा अर्ज व्हायरल

1595

सुट्टीसाठी अर्ज करणे आणि सुट्टी मंजूर करणे ही तशी सर्वसाधारण बाब. पण, सुट्टी मिळवण्यासाठी काय काय कारणं सांगितली जाऊ शकतात, याचा काही नेम नाही. मध्य प्रदेशातील एका पोलीस कॉन्स्टेबलने घरच्या म्हशीची सेवा करण्यासाठी सुट्टीचा अर्ज लिहिला आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात तैनात असलेल्या राज्य सशस्त्र पोलीस दलाच्या 9व्या बटालियनमध्ये कुलदीप तोमर नावाचे कॉन्स्टेबल आहेत. तोमर यांची आई गेल्या काही काळापासून आजारी असते. तिच्या देखभालीसाठी 10 दिवसांच्या सुट्टीचा अर्ज तोमर यांनी दिला होता. मात्र, आईच्या तब्येतीच्या कारणासोबत त्यांनी अजूनही एक कारण दिलं होतं. ते कारण गमतीशीर आहे.

constable-letter-buffalo

या पत्रात तोमर लिहितात की, माझ्या आईची तब्येत ठीक नसल्याने मला सुट्टीची गरज आहे. तसंच माझ्या घरी एक म्हैस पाळलेली असून तिला नुकतंच रेडकू झालं आहे. तिच्या सेवेसाठी देखील मला सुट्टीची गरज आहे. मी लहान असल्यापासून या म्हशीचं दूध प्यायलो आहे. तिच्या दुधाचे उपकारही मला फेडायचे आहेत. तिचं दूध पिऊनच मी पोलीस भर्तीसाठी व्यायाम करत असे. तिच्यामुळेच आज मी पोलीस दलात आहे. त्यामुळे तिचं माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे. तिने माझ्या वाईट काळात माझी साथ दिली आहे. आता तिची सेवा करणं माझं कर्तव्य आहे, असं तोमर यांच्या अर्जात नमूद करण्यात आलं आहे.

तोमर यांचं हे पत्र व्हायरल झालं आणि तोमर यांच्या वरिष्ठांनी त्यांना चांगलंच खडसावलं. मात्र, तोमर यांनी हे पत्र आपण लिहिल्याचं नाकारलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या