लाखो रुपये खर्चूनही गुडसुरकर अंधारातच

13

सामना प्रतिनिधी । गुडसुर (लातूर)

गुडसुर येथे जिल्हा परीषदेतर्फे लाखो रुपये खर्च करून एलईडी लॅम्प बसवण्यात आले होते पण गेल्या एक ते दिड वर्षांपासून हे लॅम्प अचानक बंद पडल्याने संपूर्ण गाव काळोखात बुडाले आहे.

लातूर जिल्हा परीषदेतर्फे संपूर्ण गाव प्रकाशमय करण्यासाठी गावातील चौकाचौकात एलईडी लॅम्प बसवून संपूर्ण गाव प्रकाशमय करण्यात आले. यामुळे गावातील भुरट्या चोऱ्याचे प्रमाण बरेच कमी झाले होते. पण काही महिन्यातच एलईडी लॅम्प बंद पडले. या बाबतीत गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामसभेत या बाबतीत सरपंच व ग्रामसेवकांना याची माहिती दिली. या प्रकरणास दीड वर्ष लोटले तरी या एलईडी लॅम्प दुरूस्त केले जात तर नाहीच पण पोलवर असलेले बल्बही गायब झाल्याचे दिसत आहेत. यामुळे संभाजी चौक, शिवाजी चौक अशा अनेक मुख्य चौकात अंधार पसरलेला आहे. जे काही एक दोन बल्ब चालू आहेत ते दिवस राञ चालूच आहेत. अशाच प्रकारे गावातील नागरीकांना अनेक नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या बाबतीत ग्राम विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या बाबतीत मला काहीच माहीती नसून मी सरपंचांना विचारून सागतो. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष घालून गुडसुर येथील नागरीकांची होणारी गैर सोय दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या