मध्य रेल्वेच्या स्थानकांवर एलईडीचा प्रकाश

15

सामना प्रतिनिधी । मुंबई

ऊर्जाबचतीचा संदेश देण्यासाठी मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील तब्बल १७० रेल्वे स्थानकांवर एलईडी दिव्यांचा प्रकाश उजाळणार आहे. या एलईडी दिव्यांमुळे मध्य रेल्वेच्या विजेच्या बिलात ४० टक्के बचत होणार आहे, तसेच देखभालीचा खर्चही कमी होणार आहे. केंद्र सरकारने पर्यावरण संवर्धन तसेच अक्षय ऊर्जा स्रोत वाढविण्याचे धोरण अंगीकारले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर सोलार पॅनल बसविणे, रेन हार्वेस्टिंगसारखे प्रकल्प उभारणे आदी प्रकल्प राबविले जात आहेत.

यंदाच्या जूनमध्ये १६ रेल्वे स्थानकांमध्ये शंभर टक्के एलईडी लाइटस् लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. या एलईडी दिव्यांमुळे मध्य रेल्वेच्या वीज बिलात वार्षिक ३५ लाखांची बचत होणार आहे. मध्य रेल्वेच्या ३४ उपनगरी स्थानकांसह एकूण १७० स्थानके त्यामुळे शंभर टक्के एलईडी दिव्यांनी उजळली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या