सिंह

2870

“पेरलेला एक दाणा शंभर दाण्यांचे कणीस आपल्याला देतो. सत्कार्याचे काम पेरल्यास नेता हजारो – लाखोंचा दाता व वैभवसंपन्न होतो. लोभाचा स्पर्श झाल्यास अनर्थ होण्यात वेळ लागणार नाही.’’

ज्या फ्रकारचे तुमचे प्रयत्न असतील तसेच यश तुम्हाला मिळेल. चौफेर घोडदौड होईल. प्रगतीची प्रत्येक संधी घ्या व त्याचे सोने करा. २०१६ ची दिवाळी फारच विविधतेची ठरेल. नरकचतुर्दशी ते दिवाळी पाडवा अत्यंत उत्साहाचा व आनंदाचा ठरणार आहे. नव्या योजना या दिवशी आरंभ करू शकाल. भाउैबीजेच्या दिवशी एखादे दडपण येईल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल व त्यातूनच नवी प्रेरणा तुम्हाला मिळणार आहे. क्षेत्र कोणतेही असो संघर्षाचा भरभक्कम अनुभव तुमच्याकडे आहे. त्यामुळे नवे डावपेच राजकीय – सामाजिक क्षेत्रात टाकता येतील. व्यवसायात, नोकरीत प्रगतीचे पाऊल पडेल. वर्षभर कन्या राशीत म्हणजे सिंहेच्या धनस्थानात गुरु महाराज पडेल. २६ जाने २०१७ शनी धनु राशीत प्रवेश करीत आहे. तुमचे उन्नतीचे क्षेत्र व्यापक स्वरूप धारण करेल. कुटुंबातील समस्या सोडवता येतील. २१ जून शनी वक्री होऊन पुन्हा वृश्चिकेत येत आहे. २६ ऑक्टोबर २०१७ शनी मार्गी होऊन धनु राशीत प्रवेश करीत आहे. तुमचा मार्ग निर्वेध होईल. १८ ऑगस्ट २०१७ कर्क राशीत म्हणजे सिंहेच्या व्ययेत राहू व मकरेत केतू प्रवेश करीत आहे. १२ सप्टेंबर २०१७ गुरु महाराज तुळेत म्हणजे तुमच्या पराक्रमस्थानात प्रवेश करीत आहे. तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. तुमचा अधिकार वाढणार आहे. लोकप्रियता वाढेल. त्यामुळे लोकांच्या उपयोगी येतील अशा भव्यदिव्य योजना तयार करा. तुमच्यावरील आरोप दूर होतील. नव्या आत्मविश्वासाने परिस्थितीवर विजय मिळवाल. मितभाषी तुम्ही आहात. निष्कारण बडबड करून स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा तुमचा स्वभाव नाही. तुम्ही स्वतः मानाने राहता व दुसऱयालासुद्धा मानाने वागवता. तुमचे मन ओळखणे मात्र कठीण आहे. त्यामुळे शत्रूला त्याची जाणीव न होऊ देता त्याला काटशह देता. तुमच्या मनातील ध्येयाची पूर्ती होऊ शकेल. म्हणूनच मोठय़ा वाटेने जा, भाग्योदय होईल. पुढील भविष्यवेध सविस्तर पुढे पाहूया.

राजकीय – सामाजिक क्षेत्र:

ग्रहांची साथ असते तेव्हा कोणत्याही संकटावर मात करता येते. राजकीय – सामाजिक क्षेत्रात तुमच्या पद्धतीनुसार व अनुभवानुसार प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. योग्य सल्ला घेऊन योग्य प्रयत्न केल्यास यशाचे शिखर गाठता येईल. डिसें.मध्ये तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होईल. फेब्रु. ते जून तुमच्या योजना गतिमान होतील. मान-प्रतिष्ठा मिळेल. दौऱयात यश मिळेल. महिला, शेतकरीवर्ग अथवा इतर सामाजिक कार्यात विशेष कार्य करता येईल. आर्थिक सहाय्य मिळेल. त्यामुळे कार्याचा डोलारा उभारता येईल. उत्साह व आत्मविश्वास वाढेल. नोव्हे., एप्रिलमध्ये अडचणी वाढतील, परंतु मात करता येईल. जाने., जुलैमध्ये प्रवासात सावध राहा. प्रकृतीची काळजी घ्या. वाद वाढेल. कोर्टकचेरीची झंझट वाढेल. संयमाने व जिद्दीने सर्व समस्या सोडवता येतील. सप्टेंबरपासून पुढे प्रगतीचा नवा उच्चांक गाठण्याची तयारी करता येईल.

नोकरी व व्यवसाय:

या वर्षात शेतकरीवर्गाची स्थिती सुधारेल. खरेदी-विक्री फायदा होईल. ग्रहांची साथ असलेला कालावधी प्रत्येकाच्या जीवनात मोजकाच असतो. त्यामुळे यावर्षात मिळालेल्या प्रत्येक संधीचे तुम्हाला सोने करता येईल. नोकरीत चांगला बदल होईल. मनासारखे बदल करून घेता येतील. वरिष्ठांच्या समवेत संबंध दृढ होतील. परदेशी जाण्याचा योग येईल. व्यवसाय मोठय़ा प्रमाणात वाढवता येईल. गुंतवणूकदार मिळतील. शेअर्समध्ये योग्य गुंतवणूक केल्यास पुढील दिवाळीला मोठा लाभ होईल. थोरामोठय़ांच्या मदतीने धंद्यासाठी चांगले काम मिळवता येईल. डिसे., जाने.मध्ये नोकरी व धंद्यात समस्या येतील. मार्च ते जून तुमच्या मनाप्रमाणे घटना घडतील. कौटुंबिक वाटाघाटीचा प्रश्न या कालावधीत सोडवता येईल. तसेच कोर्टकचेरीचा प्रश्न सुटेल. जुलैमध्ये किरकोळ दुखापत किंवा छोटेसे ऑपरेशन संभवते. घर, वाहन, जमीन इ. इस्टेट होईल. सुखाची अपेक्षा पूर्ण होईल.

विद्यार्थी व तरुण वर्गासाठी:

चांगले स्वप्न पाहणे कठीण नसते, परंतु त्या स्वप्नपूर्तीसाठी करावे लागणारे प्रयत्न मात्र कठीण असतात. मात्र या वर्षात तुम्ही मागावे आणि ग्रहांनी द्यावे हा योग आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात प्रभावी ठराल. कला, क्रीडा, साहित्य प्रगतीची संधी मिळेल. उत्साहवर्धक वातावरण राहील. मौज-मजा करण्यात वेळ कापरासारखा उडून जातो. ध्येय ठरवा व मेहनत घ्या. नोव्हें., जाने. व जुलैमध्ये वाहन जपून चालवा व शांत डोक्याने समस्या सोडवा. उज्ज्वल यशासाठी अनेक वाटा खुल्या आहेत.
महिलांसाठी ः तुमच्या कल्पनेतील गोष्टी सत्यात येउै शकतात. सहनशील व कष्ट घेण्याची तुमची वृत्ती आहे. पुढेपुढे करण्याचा तुमचा स्वभाव नाही. तुम्हाला मानसन्मान मिळेल. आप्तेष्ट, मित्र यांच्यात वर्चस्व वाढेल. तुमचे चौफेर कौतुक होईल. समाजव्यापी धंदा, नोकरीत मनाप्रमाणे काम करता येईल. प्रवासाचे सुख मिळेल. संतती सुख मिळेल. जीवनसाथीची मर्जी राहील. ऑक्टोबर, जाने.मध्ये खोटय़ा पेमाच्या नादी लागून जीवन उधळू नका.

आपली प्रतिक्रिया द्या