कुत्राच ठरला ‘शेर’, बिबट्याची झाली मांजर

20
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

बिबट्याचा हल्ला हे मुंबईसाठी तसं नवीन नाही. पण अनेकदा बिबट्याच्या हल्ल्यात प्राणी-मनुष्य जखमी झाल्याचे किंवा बिबट्याने ठार केल्याच्या वृत्त येते. मात्र ९ जून, शुक्रवारी रात्री एक वेगळीच घटना घडली.

मुंबईतील ‘बॉम्बे वेटर्नरी कॉलेज’ (पशुवैद्यकीय महाविद्यालय)मध्ये रात्रीच्या सुमार एक बिबट्या शिरला. तो भटक्या कुत्र्यांचा पाठलाग करत होता. हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये पायऱ्यांवरून धावणाऱ्या भटक्या कुत्र्यामागे बिबट्या लागल्याचे दिसते. बिबट्या झडप घालून कुत्र्याला दातात पकडतो. समोर दुरसा कुत्रा बिबट्यावर भुंकताना दिसतो पण तो लगेच पळ काढतो. इकडे बिबट्याच्या तावडीत सापडलेला कुत्रा आपलं सारं बळ अंगी एकवटून बिबट्याच्या तोंडावर पंजा मारतो आणि त्या झटक्याने बिबट्याच्या तोंडातून कुत्रा सुटतो आणि अत्यंत चपळाईने दूर जातो. बिबट्याला मात्र त्याला पुन्हा पकडण्यात अपयश येतं. अखेर तो दुसऱ्या कुत्र्याला भक्ष्य करण्यासाठी त्याच्या मागे धावू लागतो.

पाहा व्हिडिओ:

आपली प्रतिक्रिया द्या