उल्हासनगरमध्ये भरदिवसा इमारतीत बिबट्या घुसला

सामना ऑनलाईन । ठाणे

उल्हासनगरमध्ये बिबट्या भरवस्तीत घुसल्याने सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे. उल्हासनगरच्या सेक्शन-५ मधील भाटिया चौकातील एका इमारतीत बिबट्या घुसला होता. सकाळच्या वेळी बिबट्या मानवी वस्तीत आल्याने तेथील नागरिकांची पाचावर धारण बसली.

बिबट्या वस्तीत घुसल्याची माहिती नागरिकांना वन विभागाला दिली, मात्र वन विभागाचे कर्मचारी घटनास्थली पोहोचलेच नाही. बिबट्या उल्हासनगरमध्ये घुसल्याची वार्ता पसरल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. बिबट्या एका इमारतीलच्या कम्पाउंडमधून बाहेर पडला आणि दुसऱ्या एका इमारतीत घुसला. हा सगळा प्रकार इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.