‘या’ लेस्बियन दाम्पत्याला एकाच वेळी झाल्या पाच मुली

अमेरिकेतील एका लेस्बियन दाम्पत्याने चक्क एकाच वेळी पाच मुलींना जन्म दिला आहे. हिथर लांगले (39) व प्रिशिला रॉड्रीग्ज (35) अशी त्या दोघींची नावं असून त्या दोघींना याआधी तीन वर्षांची एक मुलगी आहे. या दोघीही मूळच्या टेक्सास येथील आहेत.

हिथर व प्रिशिला या दोघी गेल्या नऊ वर्षांपासून एकत्र असून यातील हिथर ही टेस्ट ट्यूबद्वारे गरोदर राहिली होती. गरोदर राहिल्यानंतर सहा आठवड्यांनी त्यांना समजले की हिथरच्या गर्भात चक्क एक दोन नाही तर पाच बाळं आहेत. हिथर ही 28 आठवड्यांची गरोदर असताना तिची सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाली. त्यानंतर तब्बल सहा महिने हिथर व तिची बाळं रुग्णालयात उपचार घेत होती.

हिथर व प्रिशिलाला एक तीन वर्षांची देखील मुलगी असून तिचे नाव सॉयर आहे. तर इतर पाच मुलींची नावं त्यांनी हॅडली, रेगान, झरिया, झीला, जोसलिन ठेवली आहेत. अमेरिकेत एकाच महिलेला एका वेळी पाच मुली जन्माला येण्याची ही दुसरी घटना आहे.

आपली प्रतिक्रिया द्या