समलैंगिक नात्याला आईचा नकार, मुलीने केली हत्या

45

सामना ऑनलाईन । गाझियाबाद

आपल्या शिक्षिकेशी असलेल्या समलैंगिक नात्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या आईची तिच्या मुलीने हत्या केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील असून या घटनेनंतर मुलगी फरार आहे.

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, गाझियाबाद येथील कविनगरमध्ये आरोपी तरुणी तिच्या आईसोबत राहत होती. जवळपास दोन वर्षांपासून सदर तरुणीचे तिच्या ट्युशनच्या शिक्षिकेसोबत समलैंगिक संबंध होते. याला तरुणीच्या आईचा विरोध होता. आईच्या विरोधामुळे सात महिन्यांपूर्वी ही तरुणी तिच्या शिक्षिकेसोबत घर सोडून पळून गेली होती. पण, पोलिसांनी तिला परत आणलं होतं. मात्र, त्यानंतरही तिचे संबंध पूर्ववत सुरू होते. ९ मार्च रोजी तरुणीच्या आईने पुन्हा तिच्या संबंधांवरून तिला बोलल्याने तरुणीने आईसोबत भांडण केलं. त्यावेळी रागाच्या भरात तरुणीने जड वस्तूने आईच्या डोक्यावर प्रहार केला.

या घटनेनंतर तिच्या आईला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आईवर हल्ला केल्यनंतर आरोपी तरुणी आणि तिची शिक्षिका दोघीही फरार झाल्या आहेत. पोलिसांनी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या