अधिकाऱ्यांना राजकीय टार्गेट करू नका! 71 माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोदींना पत्र

513

‘आयएनएक्स मीडिया’प्रकरणी वित्त मंत्रालयातील चार माजी अधिकाऱयांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याने देशभरातील सेवानिवृत्त अधिकाऱयांनी चिंता व्यक्त केली आहे. इमानदारी आणि मेहनतीने देशसेवा केलेल्या अधिकाऱयांना राजकीय टार्गेट करू नये अशा आशयाचे पत्र 71 माजी प्रशासकीय अधिकाऱयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले आहे. एका विशिष्ट कालावधीनंतर कोणतीच प्रकरणे बाहेर येता कामा नयेत.

विवादास्पद प्रकरणांची फाईल पुन्हा काढायची झाल्यास त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी लागेल असा कायदा करण्यात यावा. माजी कॅबिनेट सचिव के. एम. चंद्रशेखर, माजी परराष्ट्र सचिव शिवशंकर मेमन, माजी पोलीस महासंचालक ज्युलियो रिबेऱो, माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या या पत्रावर सह्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या