दिल्ली डेयरडेविल्सकडून रबाडाच्या जागी खेळणार ‘हा’ खेळाडू

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयपीएल स्पर्धेच्या तोंडावच दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा पाठदुखीमुळे स्पर्धेतून आऊट झाला होता. आता रबाडाच्या जागी दिल्ली डेअर डेव्हिल्सने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज लियम प्लंकेटचा समावेश केला आहे.

दक्षिण आफ्रिका संघाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कागिसो रबाडाला पाठीच्या दुखण्याचा खुप त्रास होत आहे. त्यामुळे तो तीन महिने क्रिकेट खेळू शकणार नाही. त्याला आरामाची खूप गरज आहे. कारण जूलैमध्ये होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी रबाडाला तंदुरूस्त राहण्याची गरज आहे.

दिल्ली डेअरडेव्हिल्स प्रिव्ह्यू : गंभीर- पॉन्टिंगची जोडी कमाल करेल?