अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला जन्मठेप

40
woman

सामना ऑनलाईन । नांदेड

आपल्या स्वतःच्या आठ वर्षीय मुलीवर जन्मदाता नराधम पित्याने सतत बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी माधव रामा येल्लेवाड या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भोकरचे जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

वाणी बिद्राळी (तेलंगणा) निर्मल जिल्ह्यातील आरोपी माधव रामा येल्लेवाड गेल्या दोन वर्षापासून आपल्या स्वतःच्या आठ वर्षीय मुलीवर सतत घरी व शेतात नेवून जबरी बलात्कार करीत होता. एवढेच नव्हे तर पत्नी आशाबाई हिच्यावर देखील असाच अत्याचार करीत होता. आरोपी माधवच्या राक्षशी कृत्याला कंटाळुन पत्नी आशाबाईने १ सप्टेंबर २०१७ रोजी भोकर पोलिसात फिर्याद दिली. आशाबाईच्या फिर्यादीवरून आरोपी माधव याच्या विरुध्द कलम ३७६(२) ३७७ ४/६ भादवि प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तपास करून जिल्हासत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. वैद्यकीय अहवाल, मुलीच्या जबाबावरुन आरोप सिध्द झाल्याने शुक्रवारी (२३ मार्च) रोजी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शेख यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अवघ्या सहा महिन्यात हा निकाल लागल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या