अतिवृष्टी-पुरामुळे बाधित 2 लाख 29 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले!

अतिवृष्टी आणि पुरामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरीबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे गेल्या चार दिवसांत जवळपास 2 लाख 29 हजार 74 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 149 जणांचा मृत्यू तर 64 जण अजूनही बेपत्ता आहेत.

कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत अजूनही पुरसदृश परिस्थिती, रस्ता खचणे, दरड कोसळणे यांसारख्या घटना घडत आहेत. त्या ठिकाणी एनडीआरएफ, लष्कराच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. ‘एनडीआरएफ’च्या 25 टीम, ‘एसडीआरएफ’च्या 4 टीम, कोस्ट गार्डच्या 2 टीम, नेव्हीच्या 5 टीम, लष्कराच्या 3 टीम बचावकार्य करत आहेत. चिपळूण येथे तात्पुरत्या 5 निवारा पेंद्रांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

एनडीआरएफ, लष्कराच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे

मृत्यू  :  149
जखमी : 50
बेपत्ता:  64

सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेले नागरिक

 रत्नागिरी :     1200
सिंधुदुर्ग:        1271
रायगड:         1000
ठाणे:           6930
सातारा:         7530
कोल्हापूर:      40882
सांगली:        169998
पुणे:            263

आपली प्रतिक्रिया द्या