झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ‘हा’ पदार्थ, होतील जबरदस्त फायदे

तुपात जीवनसत्त्वे, मिनरल्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. या औषधी गुणधर्मांमुळे तुपाचा वापर त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे. हिवाळ्यात त्वचा खूपच कोरडी पडते. अशावेळी फक्त 1 चमचा तूप चेहऱ्याला लावल्यास चेहरा मुलायम आणि तजेलदार होतो. यासाठी तुपापासून तयार होणारे फेसपॅकही तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. त्वचा मॉईश्चराईज करण्यासाठी 2 ते 3 थेंब तूप घेऊन त्वचेला मसाज करावा. अशा प्रकारे दररोज झोपण्यापूर्वी तूप चेहऱ्याला लावून मसाज केल्यास त्वचेचा रंग सुधारण्याबरोबर इतरही फायदे होतील.

– त्वचा सुंदर दिसावी, रंग उजळ व्हावा, यासाठी दररोज 2 ते 3 थेंब तूप त्वचेला लावून 5 मिनिटांपर्यंत मसाज करा. – मालिश करण्याआधी तोंड स्वच्छ धुवून घ्या आणि टोनर लावा. त्यानंतर त्वचेवर लूप लावा. हा उपाय दररोज केल्यास चेहरा उजळ होतो.
– कोरड्या त्वचेसाठी तूप खूप फायदेशीर आहे. ते त्वचेला आतून पोषण देते तसेच मॉइश्चरायझेशन ठेवते. कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी तूप आणि बेसनाचा फेस पॅक लावू शकता. तो काढताना चेहऱ्यावर थोडे गुलाबपाणी शिंपडा आणि हलक्या हातांनी चेहरा स्वच्छ करा. यामुळे मृत त्वचेचा थर निघून जाईल आणि तूप त्वचेच्या पेशींना आर्द्रतेने भरण्यास मदत करते.

– त्वचेचा रंग सुधारण्यासाठी बेसन आणि तुपाचा फेस पॅक लावल्यास त्वचेचा पोत सुधारेल. चेहरा तजेलदार होईल.