गुलाबी ओठांसाठी घरीच तयार करा लिप बाम, चेहऱ्याचेही वाढेल सौंदर्य

बीटमध्ये लोह,आणि फॅालिक एसिड असते त्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते.रक्त वाढीसाठी दररोज एक कप बीटाचा रस घ्यावा.

बीट आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये लोह, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम, फोलेट, पोटॅशियम, फायबर, अँटीऑक्सिडंट्स यासारखे पोषक घटक आढळतात. आरोग्यासोबतच बीट त्वचा आणि केसांकरिता फायदेशीर ठरते. बीटरूट आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. बीटापासून घरगुती लीपबाम तयार करता येते. चेहऱ्याच्या सौंदर्यवाढीसाठी आणि केस मजबूत होण्यासाठी बीट वापरल्याने फायदा होतो.

चेहरा आणि ओठांकरिता बीटचे लिपबाम तयार करायचे असल्यास 1 किसलेले बीट, 2 चमचे कोरफडीचा गर, 1 व्हिटॅमिन इ कॅप्सूल घ्यावे. सर्वप्रथम कच्च्या लाल बीटाचे मोठे तुकडे कापून घ्यावेत. आता हे तुकडे किसणीवर किसावेत. हा किस एका गाळणीत घेऊन चमच्याच्या मदतीने दाबून त्यातील रस काढून घ्यावा. त्यानंतर बीटाच्या रसात दोन चमचे कोरफडीचा गर आणि व्हिटॅमिन ‘इ’ कॅप्सूलची 1 कॅप्सूल फोडून घालावी.  आता हे तयार केलेले मिश्रण व्यवस्थित एकजीव करावे. एका काचेच्या डबीत भरून स्टोअर करून ठेवावे. आवश्यकतेनुसार हे लिप बाम ओठ आणि चेहऱ्याकरिता वापरता येते.

 केसांच्या मजबुतीसाठी

केस वाढणे आणि दाट होण्याकरिता 1 गडद लाल रंगाचे बीट घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.  त्यानंतर ते पाण्यात उकळवून घ्यावे.  हे पाणी थोडे थंड झाल्यावर एका स्प्रे नोझल असणाऱ्या बाटलीत भरून घ्यावे. केसांची मजबुती वाढविण्यासाठी या बिटाला उकळवून घेतलेल्या पाण्याचा वापर नक्कीच करू शकता. आपल्या गरजेनुसार केसांच्या मजबुतीसाठी नैसर्गिक हेअर टॉनिक केसांमध्ये स्प्रे करावे. त्यानंतर काही वेळा केस स्वच्छ धुवावेत.

त्वचा आणि केसांसाठी बीटाचे फायदे  

– केसांची गळती किंवा केस पांढरे होणे यासारख्या समस्या बीटरूटच्या नियमित सेवनने बऱ्या केल्या जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, बीटाचा रस केसांना डाय करण्यासाठी  वापरला जाऊ शकतो. त्याचे कोणतेही दुष्परिणाम  होणार नाहीत.

– केस वाढवायचे असतील तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे बीटरूटचा रस पिणे. यामुळे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढेल आणि केसही चमकदार होतील.

– गुलाबी त्वचा मिळविण्यासाठी त्वचेवर बीटरूटचा रस लावा आणि काही दिवसांतच त्याचा परिणाम दिसून येईल. बीटाचा रस पौष्टिक असण्याबरोबरच त्वचेवर नैसर्गिक ब्लशसारखे कार्य करते.

– बीटरूटमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. हायड्रेशन आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्म वाढवण्याकरिता बीट खाणे गरजेचे आहे.