‘या’ नैसर्गिक पदार्थांचा वापर करून वाढवा तेलकट त्वचेचं सौंदर्य, मॉइश्चरायझरचीही गरज नाही  

प्रत्येकाच्या त्वचेचा पोत वेगळा असतो. काही जणांची त्वचा तेलकट, काहींची सामान्य, तर काहींची त्वचा कोरडी असते. त्वचेचा पोत कोणताही असली, तरी मॉइश्चराइजर लावणे गरजेचे असते. त्वचेला हायड्रेटिंग आणि मॉइश्चरायझिंग करणे फायदेशीर ठरते. तेलकट त्वचेला मॉइश्चराइझरची काहीच गरज नसते असा काही जणांचा गैरसमज असतो, मात्र बाजारातील महागडे मॉइश्चरायझर वापरण्याऐवजी काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून तेलकट त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता.

तेलकट त्वचेला मॉइश्चरायझर लावण्याची गरज असते. तेलकट स्किनवर मॉइश्चरायझर वापरण्याआधी सर्वप्रथम संपूर्ण चेहेरा आधी स्वच्छ करून मगच मॉइश्चरायझर लावावे. याकरिता मॉइश्चरायझरची निवड करताना आपल्या स्किनचा पोत ओळखून मगच मॉइश्चरायझर निवडावे.

नैसर्गिक पदार्थांचा वापर

 दूध

 तेलकट स्किनला मॉइश्चरायझिंग करण्यासाठी दुधाचा वापर करावा. दुधामध्ये असणाऱ्या प्रोटीन आणि लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे तेलकट स्किनला डिप क्लिन होण्यास मदत होते. यासोबतच दुधाच्या वापरामुळे तेलकट स्किनमध्ये तेल तयार करण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी केला जातो. तेलकट स्किनला मॉइश्चरायझिंग करताना कच्च्या दुधाचा वापर न करता गरम करून थंड केलेले दूध वापरा.

कोरफडीचा गर

तेलकट स्किनसाठी ऐलोवेरा जेल हे  बेस्ट मॉइश्चरायझिंग आहे. आपण तेलकट स्किनसाठी जर कोणत्या मॉइश्चरायझरचा वापर करत असाल तर ते मॉइश्चरायझर वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड असावे हे लक्षात ठेवा. रात्री झोपताना ऐलोवेरा जेल आपल्या संपूर्ण चेहेऱ्याला लावा आणि सकाळी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून टाका. यामुळे तुमची स्किन फार तेलकट न होता व्यवस्थित मॉइश्चरायझ केली जाईल. ज्यांची स्किन फार तेलकट आहे अशा व्यक्तींनी दिवसा ऐलोवेरा जेल लावून उन्हांत जाऊ नये, असे केल्यास तुमची स्किन अजूनच तेलकट दिसेल.

गुलाब पाणी

 तेलकट स्किनवरील तेलकटपणा दूर घालविण्यासाठी गुलाब पाणी हा उत्तम उपाय असू शकतो. तेलकट स्किनसाठी गुलाब पाणी हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. गुलाब पाण्याचा वापर केल्याने त्वचा कोरडी पडणार नाही तसेच त्वचेमधून येणारे जास्तीचे तेल कमी करण्यास मदत होईल. गुलाब पाण्यात आपण दूध किंवा दही घालून ते स्किनवर लावू शकतो. दही व दूध हे उत्तम  स्किन एक्‍सफोलिएटर आहेत, यांचा वापर केल्यामुळे त्वचा डिप क्लिन होण्यास मदत होते.