चेहरा थकल्यासारखा वाटतोय का? दिवसभर फ्रेश दिसण्यासाठी रोज सकाळी करा ‘ही’ 5 कामे

सकाळी चेहऱ्यावर काळजी घेतल्यास दिवसभर चेहरा टवटवीत राहायला मदत होते. त्यामुळे तुम्ही दैनंदिन कामकाजात कितीही व्यस्त असलात तरीही सकाळी स्वत:च्या सौंदर्यासाठी वेळ काढणे गरजेचे आहे. याकरिता पाहूया सकाळी उठल्यावर करायच्या 5 कृती. यामुळे तुमचा चेहरा टवटवीत, मुलायम आणि सुंदर दिसायला नक्कीच मदत होईल.

सकाळी चेहऱ्यावर काय लावायचं

सकाळी उठल्यानंतर त्वचेची काळजी घेण्याकरिता कोणतेही क्लिन्झर वापरू शकता. क्लींजिंगमुळे चेहऱ्यावर जमा झालेली सर्व घाण, धूळ आणि मृत त्वचा सहज निघून जाते. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटते. त्वचेनुसार क्लिंजर निवडू शकता. त्वचा संवेदनशील असेल तर अल्कोहोल आणि केमिकल फ्री क्लीन्सर लावा. त्वचा तेलकट असेल, तर ऑइल फ्री क्लींजर वापरा. कोरड्या त्वचेसाठी हायड्रेटिंग क्लीन्सर चांगले ठरू शकते.

हळद, चंदनाचा फेसपॅक

हळद आणि चंदन हे दोन्ही घटक चेहार तजेलदार करण्यासाठी मदत होते. त्यामुळे हळद आणि चंदनाचा फेस पॅक लावू शकता. सकाळी चेहऱ्यावर हळद आणि चंदनही लावता येते. यासाठी 2 चमचे चंदन पावडर घ्या. त्यात चिमूटभर हळद आणि गुलाबजल टाका. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटांनी चेहरा ताजे पाण्याने धुवा. यामुळे तुमचा चेहरा मुलायम आणि चमकदार होईल.

टोनर, मॉईश्चराईजर लावा
यानंतर टोनर आणि मॉइश्चरायझर लावू शकता. यासाठी कोणतेही हायड्रेटिंग टोनर घ्या. कॉटन बॉलच्या मदतीने चेहऱ्यावर लावा किंवा स्प्रे करा. त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. क्लींजरप्रमाणेच त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझरही घ्यावे. यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड होईल आणि कोरडेपणा दूर होईल.

सीरम लावा
अनेकदा लोक रात्री सीरम लावून झोपतात. पण सकाळीही चेहऱ्यावर सिरम लावणे आवश्यक आहे. सकाळी चेहऱ्यावर सिरम लावल्याने त्वचा सुरक्षित राहते. चेहऱ्याच्या गरजेनुसार सीरम लावावे. व्हिटॅमिन सी, अँटी-एजिंग सारखे सीरम वापरू शकता.

सनस्क्रीन लावा
सकाळी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. सनस्क्रीनमुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून चेहरा सुरक्षित राहतो. अतिनील किरणांचा त्वचेवर परिणाम होत नाही. सकाळी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावल्याने टॅनिंग, काळे डाग इत्यादीपासून बचाव होतो.