संत्र्याच्या सालीने चेहऱ्याचे सौंदर्य वाढवा, जाणून घ्या कसा कराल वापर

संत्री खाऊन साली फेकू नका, संत्र्यांच्या सालींचा सौंदर्योपचारात मोठा उपयोग होतो. या सालींपासून घरच्या घरी फेस पॅक तयार करता येऊ शकतो. सालींमध्ये असलेले पौष्टिक घटक त्वचा निरोगी करण्यासाठी मदत करतात. चमकदार त्वचेसाठी संत्र्याच्या सालींपासून नैसर्गिकरित्या चेहरा आणि त्वचेचे सौंदर्य वाढू शकते. यासाठी संत्र्याच्या सालीची पावडर अतिशय फायदेशीर ठरते.

1 चमचा संत्र्याच्या सालींची पावडर, 1 चमचा चंदन पावडर, 1 चमचा कोरफडीचा गर किंवा जेल इत्यादी साहित्य घ्यावे. सर्वप्रथम संत्र्याची पावडर, कोरफडीचा गर आणि चंदन पाडवर एकजीव करून घ्या. हा फेसपॅक 10 मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा. संपूर्ण वाळेपर्यंत तसाच चेहऱ्यावर ठेवा. 10 मिनिटांनंतर हलक्या गरम पाण्याने चेहरा धुवून घ्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्या.

संत्र्याच्या सालीच्या पावडरचे उपयोग

– मुरुम व मुरुमांचे डाग संत्र्याच्या पावडरमुळे निघून जायला मदत होते. या पावडरमध्ये जीवनसत्त्व सी भरपूर प्रमाणात असतं. संत्र्याच्या सालीमध्ये अँण्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे त्वचा निरोगी राहते.

– नैसर्गिक ब्लीच म्हणून संत्र्याच्या सालीची पावडर वापरणे फायदेशीर ठरते. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या उजळ होण्यास मदत होते.

– त्वचेला नैसर्गिक एक्सफोलिएटर अर्थात तरुणपणा देण्यासाठी नैसर्गिक खनिजे यामध्ये असतात. त्वचेच्या पृष्ठभागावरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी संत्र्याची साल उपयुक्त ठरते. कारण संत्र्याच्या सालीची पावडर नवीन पेशींच्या पुनरुत्पादनास प्रोत्साहन देते.

– संत्र्याची साल व्हिटॅमिन ‘सी’ चा एक उत्कृष्ट स्रोत आहे. यामुळे नैसर्गिकरित्या चमकदार त्वचेकरिता या पावडरची मदत होते. फेसपॅकमध्ये संत्र्याच्या सालीची पावडर टाकल्याने त्वचा नैसर्गिकरित्या चमकू शकते.