
तीव्र उन्हाचा परिणाम चेहरा आणि त्वचेवर होतो. यामुळे सनबर्न आणि त्वचा टॅन होण्याची समस्या उद्भवते. कडक उन्हाचा परिणाम त्वचेवर होऊन त्वचा रापलेली, काळवंडलेली दिसते. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर सनस्क्रीन सूट होईलच, असेही नाही. त्यामुळे सनबर्न किंवा त्वचा टॅन होण्यापासून स्वत:ला वाचवायचे असेल तर जाणून घेऊया यासाठी सोपे घरगुती उपाय.
ओटमील
ओटमीलमध्ये मध आणि दूध मिसळून सनबर्न आलेल्या जागी लावल्याने आराम मिळतो.
बर्फ
कपड्यात बर्फ गुंडाळून शेकवल्यास सनबर्नच्या समस्येवर आराम मिळतो.
कोरफड
कोरफड सनबर्नच्या समस्येवर अतिशय गुणकारी आहे. सनबर्न झालेल्या जागी त्वचेवर कोरफडीचा गर लावल्यास फायदा होतो.
खोबरेल तेल
सनबर्न झालेला त्वचेचा भाग थंड पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर तो स्वच्छ पुसून तिथे खोबरेल लावा. हा उपाय गुणकारी ठरतो.
डाळीचे पीठ, हळद आणि लिंबू
तीव्र उन्हामुळे चेहरा टॅन होतो किंवा सनबर्नची समस्या निर्णाण होते. अशा वेळी डाळीचे पीठ (बेसन), हळद आणि लिंबाचे रस हे सर्व पदार्थ एकत्र मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने उन्हामुळे रापलेली त्वचा उजळायला मदत होते.