बाळाला केळ्यामधून ‘हा’ पदार्थ खाऊ घाला, बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही

मोठ्यांच्याच आरोग्याकरिता नाही, तर लहान मुलांच्या आहारातही केळ्याच्या समावेश करणे फायदेशीर ठरते. एक ते तीन वयोगटातील मुलांना पिकलेलं केळं कुस्करून खाऊ घालण्यास हरकत नाही. सेरेलॅकमधूनही केळं स्मॅश करून लहान मुलांना खायला घातले तरी चालते. केळ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. यामुळे पचनसंस्थेला दीर्घकाळ फायदा होतो. पिकलेल्या केळ्याच्या मऊ लगद्यामध्ये सुमारे 75% पाणी असते, ज्यामुळे ते पचायला सोपे होते आणि बाळाच्या पोटावर जड होत नाही. केळ्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण योग्य प्रमाणात असते. हे पोषक घटक दीर्घकाळापर्यंत तुमच्या बाळाच्या हाडांची वाढ आणि विकास करण्यास मदत करू शकतात. तुम्ही तुमच्या बाळासाठी केळी सेरेलॅक बनवू शकता. यामुळे केळ्यातून मिळणारे पौष्टिक घटक बाळाला मिळतात.

केळीमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट असतात जे बाळाच्या ऊर्जेची गरज पूर्ण करू शकतात. यात असलेल्या फोलेटमुळे मेंदुची शक्ती सुधारते तसेच यातील पोटॅशियम शरीराच्या सर्वांगीण निरोगी विकासासाठी गरजेचे आहे. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ‘बी’ जीवनसत्त्वेदेखील असतात. केळ्यातील लोहाचे प्रमाण अशक्तपणा टाळण्यास मदत करते तर व्हिटॅमिन ए दृष्टी सुधारण्यास मदत करते. यामुळे आरोग्यदृष्ट्या बाळ निरोगो राहण्यासाठी जाणून घेऊया बाळाला केळं सेरेलॅक बनवण्याची पद्धत –

केळं सेरेलॅक बनवण्याची पद्धत
बाळासाठी केळी सेरेलॅक बनवण्यासाठी, 3 चमचे होममेड सेरेलॅक, केळी (सोललेली आणि कुस्करलेली केळी), 1 टीस्पून मनुका प्युरी आणि 1 कप पाणी आवश्यक आहे.

कृती
– एका बाऊलमध्ये घरी तयार केलेले सेरेलॅक घ्या. त्यामध्ये मनुका प्युरी आणि पाणी एकत्र करून मिश्रण तयार करा. यामध्ये अजिबात गुठळ्या राहू देऊ नका.
हे मिश्रण आता सॉस पॅनमध्ये घाला आणि मंद आचेवर दहा मिनिटे शिजवा. यामुळे हे मिश्रण थोडे घट्ट होईल. आता गॅस बंद करा आणि मिश्रणाला थंड होऊ द्या.

– आता या मिश्रणात व्यवस्थित कुस्करलेले केळं घाला आणि मुलांना भरवा.

केळं सेरेलॅक तयार करण्यासाठी केळ्याची निवड कशी कराल ?
नेहमी पिकलेली केळी बाळाला द्या कारण ती सहज पचतात शिवाय कच्च्या हिरव्या केळ्यांपेक्षा ही केळी जास्त गोड आणि स्वादिष्ट असतात. यासाठी कच्ची केळी घेऊन ती पिकेपर्यंत ठेवू शकता. ही केळी लवकर पिकवायची असतील तर कागदाच्या पिशवीत ठेवू शकता. कागदाच्या पिशवीत ही केळी पिकवण्यासाठी ठेवताना पिशवीत सफरचंद ठेवा.

बाळाच्या आरोग्यासाठी 

  • केळी प्युरी, सेरेलॅक किंवा इतर कोणत्याही रेसिपीमध्ये तुम्ही आईचे दूध किंवा फॉर्म्युला मिल्क जोडू शकता. यामुळे, मूल अन्न सहजपणे गिळते. तुम्ही बाळासाठी केळीची प्युरीही बनवू शकता.
  • तसेच या रेसिपीसाठी विविध हंगामी फळे जसे की बेरी, किवी, सफरचंद, नाशपाती आणि गोड बटाटेही वापरून लहान मुलांसाठी गोड किंवा चवदार सेरेलॅक पाककृती तयार करू शकता.