तुम्हीही कमी झोपता? सावधान… हे वाचा!

3144

आजच्या या धकाधकीच्या, धावपळीच्या जगात अनेक जण अधिक पैसा कमावण्यासाठी असो वा लवकरात लवकर यशस्वी होण्यासाठी 16 तासांपेक्षा अधिक काम करतात. कामाच्या या व्यस्थतेमुळे अनेकांची झोप पूर्ण होत नाही. आपल्या शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी किमान सात तासांची झोप घेणे आवश्यक असते. मात्र अनेक लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. तुम्हीही जर असे करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

आपल्या शरीरात चयापचय (मेटॅबॉलिक) प्रक्रियेचे मोठे योगदान असते. यामुळे शरीरास अन्नाच्या मदतीने उर्जा निर्माण होते. मात्र अनेकवेळा वाढत वय किंवा चुकीच्या दिनचर्येमुळे चयापचय प्रक्रियेत बिघाड होऊन आपल्या शरीराला नकोत्या समस्यांना सामोरे जावे लागते. अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की, झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील चयापचय प्रक्रियेवर परिणाम होऊन वजन वाढण्यास सुरुवात होते. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा शरीरातील अनेक अवयवय आपले काम करता असतात. यामध्ये हार्मोन्स डिस्चार्ज होणे किंवा मांसपेशी आलेल्या बिघाडाची दुरुस्ती करण्याचे काम आपले विविध अवयव करत असतात. मात्र तुम्ही पुरेशी झोप न घेतल्यास यामुळे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण होते.

लिपिड रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील चयापचय प्रक्रियेवर त्याचा विपरित परिणाम होतो आणि नकळतपणे वजन वाढत जातं. विद्यापीठाच्या प्राध्यापकांच्या मते, अनेक दीर्घकाळापासून तुम्ही कमी झोप घेत असला तर त्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढतो. याबाबत जाणून घेण्यासाठी संशोधकांनी काही लोकांवर संशोधन केले. या संशोधनात या लोकांना चार दिवस अगदी कमी वेळ झोपण्यास सांगण्यात आले आणि त्यांना उच्च कॅलरी असलेला आहार देण्यात आला. यानंतर संशोधकांनी या लोकांच्या रक्ताचे नमुने घेतले असता. यामधून ही गोष्ट उघड झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या