थंडीत हाडांचे दुखणे वाढलेय? ‘हे’ पदार्थ खा, सांधेदुखीवर मिळेल आराम

हल्ली कमी वयातच बैठे काम, व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या पद्धती यांमुळे हाडांचे दुखणे सुरू होते. बदलत्या ऋतुमुळे वातावरणातही बदल होतो. हवेतील वाढत्या गारव्यामुळे सांधे दुखतात, सर्दी, कोरडा खोकला यासारख्या आजारांत वाढ होते. याशिवाय त्वचेचे विकार, केस रुक्ष होणे, पचनशक्तीवर परिणाम या समस्याही उद्भवू शकतात. या दिवसांत हवेत गारठा असल्याने हाडे ठणकण्याची समस्या उद्भवते. बैठे काम, व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या पद्धती यांमुळे हाडांचे दुखणे हल्ली कमी वयातच त्रास देते. अशावेळी आहार, व्यायाम यांसारख्या गोष्टींनी या समस्या काही प्रमाणात आटोक्यात आणता येतात. हिवाळ्याच्या दिवसांत हाडांचे दुखणे वाढू नये यासाठी आहारात आवर्जून खायला हवेत अशा काही पदार्थांविषयी जाणून घेऊया.

ओली हळद

हळद आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असलेला घटक आहे. यामधील रासायनिक घटक शरीराच्या विविध भागांना येणारी सूज कमी करण्यास उपयुक्त ठरतात.

लसूण

लसणात डायलिल डिससल्फाईड हा घटक असतो तो दाह कमी करण्यास उपयुक्त असतो. त्यामुळे हाडांसाठी लसूण फायदेशीर ठरतो.

आलं

आलं मसाल्यांपैकी एक महत्त्वाचा घटक आहे. शरीरात जळजळ किंवा दाह वाढवणाऱ्या पदार्थांवर आले गुणकारी ठरते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत आहारात आवर्जून आल्याचा समावेश करायला हवा.

आक्रोड

आक्रोड सुकामेव्यातील एक प्रमुख पदार्थ आहे. यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने दुखणे कमी होण्यास याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत आहारात आक्रोडाचा आवर्जून समावेश करायला हवा.