लठ्ठपणा, मधुमेहावर गुणकारी आहे ‘हा’ पदार्थ, जाणून घ्या

स्वयंपाकघरात असणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये अनेक आजारांना पळवून लावण्याचे गुणधर्म असतात. हे मसाल्याचे पदार्थ पूर्वापार आपल्या हिंदुस्थानी पदार्थ बनवण्यासाठी वापरले जातात. यापैकी मसल्याचा पदार्थ म्हणजे ‘जिरे’! बऱ्याचशा भाज्यांना, भाताचे वेगवेगळे पदार्थ बनवताना किंवा डाळी-आमटींना मस्त झणझणीत फोडणी देण्यासाठी जिरे आवर्जून वापरले जातेच. यामुळे पदार्थाची चव वाढतेच शिवाय उत्तम आरोग्यासाठी जिरे अत्यंत गुणकारी आहे. बरेचसे आजार यामुळे दूर घरगुती उपचाराकरिता जिऱ्याचा वापर केला जातो. पाहूया जिऱ्याचे आरोग्यदायी फायदे.

पचनक्रिया सुलक्ष होण्यासाठी
जिऱ्यामुळे अपचनासाठी समस्या दूर व्हायला मदत होते. लहान मुलांना अपचनाचा त्रास जाणवल्यास त्यांना जिरे खाण्याचा सल्ला दिला जातो. पचनक्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी आणि तिला गती देण्यासाठी जिरे उपयुक्त आहे. मुख्य म्हणजे जिरे लिव्हरमध्ये स्त्रवणाऱ्या पित्त स्त्रावात वाढ करण्यासाठी गुणकारी आहे.

रक्तातील साखरेवर नियंत्रण
मधुमेहाची समस्या असल्यास आहारात जिऱ्याचा समावेश करा. आठ आठवडे रोज ठराविक प्रमाणात जिरे खाल्ल्यास रक्तातील हानिकारक ट्रायग्लिसराइड्स कमी होतात.

लठ्ठपणा कमी होतो
जर तुमचे वजन खूप वाढले असेल आणि तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर जिरे उपयुक्त आहे. जिरे खाणाऱ्यांचे वजन आहारात जिऱ्याचा समावेश न करणाऱ्यांच्या तुलनेत लवकर कमी होऊ लागते.

कोलेस्ट्रॉल सुधारते
जिरे शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रित आणि कमी करण्यासदेखील मदत करते. अभ्यासात असे आढळून आले आहे की, दररोज 3 ग्रॅम जिरे खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होण्यास मदत होते.

तणाव कमी होतो
जिऱ्याचा सर्वात मोठा आरोग्य लाभ म्हणजे तो तणाव कमी करून मानसिक आरोग्य मजबूत करण्यात मोठी भूमिका बजावतो. उंदरांवर केलेल्या अभ्यासानुसार, जिऱ्यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट तणाव कमी करण्यासाठी व्हिटॅमिन सीपेक्षा अधिक प्रभावी आहेत.