‘ही’ पेये प्यायल्याने पुरुषांना टक्कल पडू शकते, आजपासूनच पिणे बंद करा; संशोधकांचा दावा

आजच्या युगात टक्कल पडणे, ही मोठी समस्या बनली आहे. सर्व वयोगटातील पुरुषांचे केस झपाट्याने गळतात. यामुळे ते टक्कल पडण्याच्या आजाराला बळी पडत आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, काही पेये आणि शीतपेये दररोज प्यायल्याने केस जास्त प्रमाणात गळू शकतात.

सध्या कोल्ड्रिंक पिण्याचा ट्रेंड तरुणांमध्ये वाढत आहे. सर्व वयोगटांतील लोकं या पेयांचा आस्वाद घेतात. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. ही साखरयुक्त पेये जास्त प्रमाणात प्यायल्याने मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो, हे तुम्ही ऐकले असेलच, मात्र संशोधकांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. तो हा की, बाजारात मिळणाऱ्या साखरयुक्त पेयांचे सेवन केल्याने पुरुषांना टक्कल पडू शकते.

चिनी शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, दररोज सोडा प्यायल्याने पुरुषांना टक्कल पडू शकते. केवळ सोडाच नाही, तर कोल्ड्रिंक्स, स्पोर्टस ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्सचे अतिसेवन केल्याने पुरुषांना कायमचे टक्कल पडू शकते.

संशोधकांच्या मते, जे पुरुष रोज सोडा किंवा इतर साखरयुक्त पेये पितात त्यांना टक्कल पडण्याचा धोका इतर पुरुषांच्या तुलनेत 57 टक्के वाढतो. सामान्यतः पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या वयाच्या 50 वर्षांनंतर उद्भवते, परंतु 25 टक्के लोकांना वयाच्या 21व्या वर्षापासून टक्कल पडण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

अति गोड चहा आणि कॉफीदेखील धोकादायक…
संशोधनात असेही आढळून आले आहे की, साखरयुक्त पेयांव्यतिरिक्त, खूप गोड चहा आणि कॉफी प्यायल्यानेदेखील पुरुषांना टक्कल पडू शकते. चीनमधील बीजिंग येथील सिंघुआ विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. यामध्ये 1000 हून अधिक लोकांचा समावेश करण्यात आला असून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशोधनाचा निकाल तयार करण्यात आला आहे. संशोधकांच्या मते, तरुण वयात टक्कल पडू नये म्हणून लोकांनी साखरयुक्त पेयांचे सेवन टाळावे.

टक्कल पडू नये यासाठी सोप्या टिप्स
– दररोज शारीरिक हालचाली करा
– पौष्टिक आहार घ्या
– जंक फूड आणि साखरयुक्त पेये पिऊ नका
– आठवड्यातून एकदा स्कॅल्प मसाज करा
– खोबरेल तेल केसांना लावता येते
– समस्या असल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा