दात आणि तोंडाच्या आरोग्यासाठी टूथपेस्ट किती आवश्यक आहे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

‘दातांसाठी सगळ्यात योग्य टुथपेस्ट कोणती?’, हा प्रश्न लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पडतो. बऱ्याच जणांचे म्हणणे असे असते की, टुथपेस्ट जास्त प्रमाणात दातांना लावल्यास दात चांगले स्वच्छ होतात, मात्र हे खरे नाही. टूथपेस्ट अति जास्त प्रमाणात वापरल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, टूथपेस्टचा वापर फक्त तोंडात फेस येण्यासाठी करावा, चवीसाठी नाही. लहान मुले आणि प्रौढ व्यक्तिंसाठी सारखीच टुथपेस्ट वापरली जाते, मात्र मुलांचे दात नाजूक आणि कमकुवत असतात. त्यामुळे ते लवकर खराब होतात. दात स्वच्छ करण्यासाठी किती टूथपेस्ट वापरणे आवश्यक आहे, ते जाणून घेऊया.

दातांच्या चांगल्या आणि खोल स्वच्छतेसाठी चांगली टूथपेस्ट वापरणे फायदेशीर ठरू शकते. Health.com च्या मते, टीव्हीवर किंवा जाहिरातींमध्ये दिसणारे टूथपेस्टचे प्रमाण लोकांना जाहिरातींची माहिती देण्यासाठी असते. सर्वसाधारणपणे, टूथपेस्ट जास्त वापरल्याने तोंडाच्या समस्या वाढू शकतात. एखाद्या व्यक्तीने एका वेळी फक्त मटारच्या दाण्याच्या आकाराची टूथपेस्ट वापरली पाहिजे . ही सूचना टूथपेस्टच्या पॅकेजिंगवरदेखील लिहिलेली असते, मात्र ज्याकडे कोणाचेच लक्ष जात नाही.

अतिशय कमी प्रमाणात टूथपेस्टचा वापर केल्यानेही दातांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. कमी टुथपेस्टमुळे फेस किंवा बुडबुडे तयार होऊ शकत नाहीत. त्यामुळे दात व्यवस्थित साफही होत नाहीत. यामुळे दातांच्या संरक्षणासाठी फ्लोराइड पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. दात साफ करताना तोंडात पाणी घालू नका, कारण फ्लोराईड दातांवर कार्य करण्यास वेळ लागतो. जर तोंडात पाणी असेल किंवा ब्रश खूप ओला असेल तर फ्लोराईडचा वापर योग्य प्रमाणात होत नाही.

लहान मुलांसाठी नुकसानकारक
जास्त प्रमाणात टूथपेस्ट वापरल्याने लहान मुलांचे दुधाचे दात खराब होऊ शकतात. याचे कारण असे की, टुथपेस्टमध्ये फ्लोराईड जास्त प्रमाणात असते. ब्रश करण्यासाठी टूथब्रशवर टूथपेस्ट जास्त घेतली जाते तेव्हा दुधाच्या दातांवर त्याचा परिणाम होतो. यामुळे कॉस्मेटिक समस्या निर्माण होऊ शकते. या समस्येमुळे दात पिवळे पडणे, दातांवर तपकिरी डाग पडणे तसेच काही वेळा दातांमध्ये खड्डेदेखील पडू शकतात. म्हणून लहान-मोठ्या प्रत्येकाने वाटाण्याच्या दाण्याएवढी टूथपेस्ट वापरली पाहिजे.

माउथवॉशचा वापर करा 
तोंडाच्या स्वच्छतेसाठी ब्रश करण्याव्यतिरिक्त माउथवॉशचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे फ्लोराईडचे प्रमाण वाढण्यास मदत होते. यासोबतच दात आणि तोंड दोन्ही जंतूमुक्त राहतील. दात स्वच्छ करण्यासाठी योग्य प्रमाणात टूथपेस्ट वापरणे आवश्यक आहे. दंत आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.