
हल्ली प्रत्येक जण आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतो. चेहरा अतिशय उजळ आणि स्वच्छ असावा, असे वाटत असते, मात्र महिलांच्या चेहऱ्यावरचे केस सौंदर्यात बाधा आणतात. चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी बऱ्याचशा महिला ब्लीच, थ्रेडींग किंवा वॅक्स करतात, मात्र या सगळ्या ट्रिटमेंट वेदनादायक असतातच, शिवाय खर्चिकही असतात. यामुळे चेहऱ्याला हानी पोहोचू शकते. यासोबतच वारंवार या ट्रिटमेंट केल्याने चेहऱ्याचे नुकसानाही होऊ शकते. चेहऱ्यावरील त्वचेचा पोत आणि रंगावरीही याचा परिणाम होऊ शकतो. याकरिता घरच्या घरीच चेहऱ्यावरील केस काढण्याची सोपी पद्धत पाहूया.
चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी फेशियल रिमूव्हर मास्कचा घऱच्या घरी तयार करता येऊ शकतो. हा घरगुती उपाय केल्याने चेहऱ्यावरील केस निघून जातीलच शिवाय त्वचेचा रंगीही उजळेल. त्वचा चमकदार व्हायला मदत होईल. पाहूया फेशियल हेअर रिमूव्हर मास्क घरी कसा तयार करायचा याविषयी –
कृती
अंड, मक्याचे पीठ आणि साखर या साहित्यापासून फेशियल हेअर रिमूव्हल मास्क तयार होतो. याकरिता सर्वप्रथम एका बाउलमध्ये अंड्याचा पांढरा भाग घ्या. त्यात मक्याचे पीठ आणि साखर घाला.
नंतर या सर्व गोष्टी नीट मिक्स करून पेस्ट बनवा. तुमचा फेशियल हेअर रिमूव्हल मास्क तयार आहे. हा फेशियल हेअर रिमूव्हल मास्क लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर हा मास्क केसांच्या जागी व्यवस्थित लावा. यानंतर 20 मिनिटे तो तसाच राहू द्या. तो पूर्ण वाळल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. हा मास्क आठवड्यातून दोन वेळा वापरून पाहा. ज्यांना त्वचेवर डाग, खाज सुटणे, मुरमांची समस्या आहे, त्यांनी हा मास्क लावणे टाळावे.