
कोरफडीच्या गरात पोषक तत्त्वाचे भांडार आहे, असे म्हटले जाते. त्वचा तजेलदार होण्यासाठी तसेच रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी कोरफडीचा गर अतिशय गुणकारी आहे. याचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत. कोरफड ही उष्ण कटिबंधीय वनस्पती असून त्यात मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. कोरफडीचा वापर तोंडाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरू शकतो. फास्टिंग ब्लड शुगर नियंत्रणात कोरफडीचा रस गुणकारी ठरू शकतो.
उत्साह वाढतो
कोरफडीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यात दाहकविरोधी गुणधर्म देखील आहेत जे शरीराला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. कोरफडीच्या रसामध्ये पॉलीफेनॉल असतात ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. कोरफडीच्या रसाचे सेवन केल्यानेही शरीराला ऊर्जा मिळते.
त्वचेच्या समस्येवर गुणकारी
कोरफडीच्या गरात असलेले गुणधर्म त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. जळजळ किंवा त्वचेच्या कोणत्याही प्रकारच्या विकारात कोरफडीच्या रसाचे सेवन खूप फायदेशीर ठरते. कोरफडीचा रस पिण्यासोबतच कोरफडीचा रस त्वचेवर लावल्यास त्वचा चमकदार होण्यासही मदत होते. काही संशोधनातून असे समोर आले आहे की, त्वचेची लवचिकता सुधारण्यासोबतच कोरफडीच्या रसाचे सेवन केल्याने सुरकुत्याही कमी होतात.
रक्तातील साखरेवर नियंत्रण
मधुमेहींनी कोरफडीचा गर सेवन केल्याने फायदा होतो. संशोधनात असे आढळून आले आहे की, प्री-डायबेटिक परिस्थितीत कोरफडीचा रस प्यायल्याने फास्टिंग ब्लड शुगरची रक्तातील पातळी सुधारण्यास मदत होऊ शकते, मात्र यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणेही आवश्यक आहे.
पचनक्रिया सुधारते
बऱ्याच जणांना पोटाशी संबंधित तक्रारी असतात. विशेषत: पचनाशी संबंधित समस्या अनेकदा दिसून येतात. कोरफडीच्या रसामध्ये अँथ्राक्विनोन ग्लायकोसाइड्स असतात ज्याचा रेचक प्रभाव असतो. ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. बद्धकोष्ठतेच्या समस्येत सुधारणा झाल्यामुळे हळूहळू पचनक्रियाही सुधारते.
तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
दात आणि तोंडाच्या समस्यांशी बहुतेक लोकं झुंजताना दिसतात. कोरफडीचा रस तोंडाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी गुणकारी ठरतो. कोरफडीचा रस आणि त्यापासून तयार केलेल्या माउथवॉशमध्ये भरपूर अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे दातांच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात.