ताणतणावामुळे होतोय त्वचेवर परिणाम, जाणून घ्या काय आहेत लक्षणे

आजच्या युगात प्रत्येक व्यक्ति कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावग्रस्त असते. तणावग्रस्त स्थितीत राहणे ही हल्लीची मोठी समस्याच बनली आहे. ताणतणावात वाढ झाल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, आपण तणाग्रस्त जीवनशैलीत वावरत आहोत याची लक्षणे तुमच्या त्वचेवर येणारी मुरुमं, जळजळ, रॅश उठणे यासारख्या समस्यांमुळे ओळखू शकता. त्वचेच्या अशा प्रकारच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते, मात्र त्वचेच्या आरोग्यावर विपरित परिणाम या लक्षणांकडेल दुर्लक्ष न करता वेळीच त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्वचेवर दिसणारी लक्षणे, त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम आणि कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे, याविषयी पाहूया!

त्वचा पातळ होणे आणि पातळ होणे
हेल्थलाइनच्या अहवालानुसार, तणावामुळे त्वचाविकारांचा धोका वाढतो. त्वचा अतिशय संवेदनशील होतो. जेव्हा त्वचा कमकुवत होते तेव्हा सूर्यकिरणांपासून कर्करोगासारख्या धोकादायक आजाराचा धोका वाढतो. जर तुमची त्वचा सतत कमकुवत होत असेल, म्हणजे सतत कोणत्या कोणत्या त्वचाविकाराला तुम्हाला सामोरे जावे लागत असेल, तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. याशिवाय आहारात जीवनसत्त्व सी युक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. अति ताणतणावामुळे त्वचा अतिशय संवेदनशील किंवा त्वचेचा अतिशय पातळ होऊ शकते.

त्वचेची जळजळ
काही वेळा अचानक त्वचेवर सूज येते किंवा जळजळ होते. हेही एक तुमच्या वाढत्या तणावाचे लक्षण असू शकते. जेव्हा मेंदू नीट काम करत नाही, तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. मानसिक ताणामुळे सोरायसिस, एक्झिमा यासारखे त्वचाविकार उद्भवू शकतात.

तेलकट त्वचा आणि पुरळ
तणावामुळे त्वचा तेलकट होते आणि मुरुमांची समस्या वाढते. विशेषतः महिलांवर त्याचा परिणाम दिसून येतो. तणावामुळे काही हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्यामुळे त्वचेच्या आतील तेलाचे उत्पादन वाढते. ज्यांना अगोदरच अशा प्रकारच्या समस्येने ग्रासले आहे, त्यांनी नेहमीच तणाव नियंत्रणात ठेवावा.

केस आणि नखांच्या समस्या
जर तुमचे केस गळत असतील तर हेदेखील तणावग्रस्त स्थितीचे कारण असू शकते. तणावामुळे आपल्या शरीरात कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते. त्यामुळे केस आणि नखांशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. काही वेळा नीट खाणे-पिणे न केल्यामुळेही असे होऊ शकते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

जखमा भरण्यास विलंब
त्वचेवर एखादी जखम झाली असेल आणि ती बराच काळ बरी होऊ शकत नसेल, तर याचा अर्थ तुमचा ताण वाढला आहे. ही समस्या बहुधा मधुमेही रुग्णांमध्ये दिसून येते, मात्र तणावामुळे जखमा भरण्यासही विलंब होऊ शकतो. यावर समुपदेशकाकडून तणावावर वेळीच उपाययोजना करावी, यामुळे मानसिक ताण कमी होऊन त्वचाविकारावर घेत असलेली औषधे आणि उपचारांचा फायदा होईल.